Home Breaking News दुचाकीचा अपघात, वकिलाचा मृत्यू

दुचाकीचा अपघात, वकिलाचा मृत्यू

● उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

2543

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

accident news : रोखठोक |  पांढरकवडा न्यायालयातील न्यायालयीन काम आटोपून वणीला परतत असताना यवतमाळ मार्गावरील गौराळा शिवारात रानडुक्कराने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले 48 वर्षीय वकिलाचा उपचारादरम्यान शुक्रवार दि. 5 मे ला पहाटे 3 वाजता मृत्यू झाला. A 48-year-old lawyer, who was seriously injured in the accident, died during treatment

ऍड. सतीश नांदेकर (48)असे मृतक वकिलांचे नाव आहे ते तालुक्यातील साखरा दरा येथील रहिवाशी असून वणीत वास्तव्यास होते. येथील न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. दि 4 मे ला ते न्यायालयीन कामानिमित्त पांढरकवडा येथील न्यायालयात गेले होते. काम आटोपून दुचाकीने परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

गौराळा शिवारात बाळू भाऊचा ढाबा परिसरात गुरुवारी दुपारी रानडुक्कराने अचानक दुचाकीला धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात हलवले. चंद्रपूर येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
वणी : बातमीदार