Home वणी परिसर “स्वर्णलिला” चा निकाल शतप्रतिशत, आदित्य लांबट अव्वल,

“स्वर्णलिला” चा निकाल शतप्रतिशत, आदित्य लांबट अव्वल,

470

वणी बातमीदार:-  केंद्रीय बोर्डाने दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला असून येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. येथील आदित्य लांबट या विद्यार्थ्याने 98.20 टक्के गुण प्राप्त करून शाळेत अव्वल स्थान पटकावले आहे.

स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेतून 132 विद्यार्थी दहावी सिबीएससी च्या परीक्षेला बसले होते. ते सर्वच्या सर्व उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या मध्ये आदित्य लांबट 98.20 टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. तर श्रेया पिदूरकर हिने 97.60 टक्के गुण मिळवुन द्वितीय आली आहे. पूजा राजूरकर हिने 94.60 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.  विध्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन रेड्डी,  प्राचार्या व्ही. सौम्या, प्राचार्य मंगेश आवारी व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.