Home Breaking News “ये भगवा रंग”..बेधुंद तरुणाई, जल्‍लोष आणि उत्‍साह

“ये भगवा रंग”..बेधुंद तरुणाई, जल्‍लोष आणि उत्‍साह

● शहनाज अख्‍तर यांच्‍या गीताने वणीकर मंञमुग्‍ध ● विजय चोरडीया यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा

862
शहनाज अख्‍तर यांच्‍या गीताने वणीकर मंञमुग्‍ध
विजय चोरडीया यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा

Wani News | सामाजीक कार्यकर्ते तसेच भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्‍य विजयबाबू चोरडीया यांचा वाढदिवस मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी संपुर्ण सप्‍ताहभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. प्रसिध्‍द गायीका शहनाज अख्‍तर यांच्‍या गायकीने वणीकर मंञमुग्‍ध झाले तर खरे आकर्षण ठरले ‘ये भगवा रंग’ हे गीत यावेळी तरुणाई बेधुंद झाली होती तर जल्‍लोष आणि उत्‍साह ओसंडून वाहत होता. Social activists as well as BJP state executive member Vijaybabu Chordia’s birthday was celebrated with great enthusiasm.

येथील टिळक चौकात बजरंग दल यांचे वतीने ढोल ताशांचा गजर व फटाक्‍याच्‍या आतिशबाजीत प्रसिध्‍द गायीका शहनाज अख्‍तर यांचे स्‍वागत करण्‍यात आले. याप्रसंगी मोठया संख्‍येने तरुणांची उपस्थिती होती. शासकीय मैदानावर आयोजीत भजनसंध्‍या या कार्यक्रमाला वणीकर जनतेनी चांगलीच दाद दिली. याप्रसंगी माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेडडी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, नितीन भुतडा,  देवराव भोंगळे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपुर्ण सप्‍ताहभर जय श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी समितीच्‍या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. 31 ऑगष्‍ट ते 7 सप्‍टेंबर पर्यंत विविध सामाजीक उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये नेञ चिकित्‍सा व मोती बिंदू शस्‍ञक्रिया शिबीर राबविण्‍यात आले. शेकडो रुग्‍णांची मोती बिंदू शस्‍ञक्रिया करण्‍यात आली. लहान मुले आणि महिलांसाठी विविध स्‍पर्धात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

शहरातील प्रख्यात व्‍यवसायीक, समाजसेवक व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्‍य असलेले दानशुर व्‍यक्‍तीमत्‍व विजयबाबु चोरडीया हे सदोदीत सर्वसमावेशक,  सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. विविध सामाजीक संघटनांसोबत त्‍यांचा जिव्‍हाळयाचा संबध आहे. त्‍यांनी वाढदिवसांचे औचित्‍य साधुन जनहितार्थ उपक्रम राबवले.
Rokhthok News

Previous articleवीज पडून 35 वर्षीय तरुण ठार
Next articleत्या…खाणीत आढळला महिलेचा मृतदेह, ती हत्याच…!
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.