Home Breaking News त्या…खाणीत आढळला महिलेचा मृतदेह, ती हत्याच…!

त्या…खाणीत आढळला महिलेचा मृतदेह, ती हत्याच…!

● तालुक्यातील मोहदा येथील घटना

2478

तालुक्यातील मोहदा येथील घटना

Wani News | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मोहदा येथे गौण खनिज उत्खनन केलेल्या खाणीत अंदाजे 22 वर्षीय महिलेचा मृतदेह मंगळवार दिनांक 5 सप्टेंबरला आढळला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजलेली असताना ती हत्याच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. The body of a 22-year-old woman was found on Tuesday, September 5.

तालुक्यातील मोहदा येथे गौण खनिज उत्खनन करण्यासाठी अनेकांना महसूल विभागाने खानपट्टा दिलेला आहे. नियमबाह्यरीत्या होणारे उत्खनन याकडे खनिकर्म व संबंधित विभाग जाणूनबुजून लक्ष देतांना दिसत नाही. बिनधास्त नियमाची पायमल्ली होत असून घटना घडल्यावर संबंधित विभाग व पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसतात हे स्थानिकांनी अनुभवले आहे.

मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर ला सकाळी त्या खाणीत साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक सरिता राजन पंडित (22) असल्याचे निष्पन्न झाले. ती आपल्या पती सोबत मोलमजुरी करायची आणि खाण परिसरात वास्तव्यास होती. तिचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी ची असावी आधी शंका वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी खरा गुन्हेगार ताब्यात घेणे गरजेचे असतानाच ही, हत्या की आत्महत्या हे तपासणे गरजेचे आहे. मोहदा येथील ज्या खाणीत त्या दुर्दैवी महिलेचा मृतदेह आढळला त्या खानपट्टा धारकावर महसूल अधिनियमानुसार गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे. मृतकाचा पती आणि त्याने ठेवलेली ती बया यांचा शोध घेतल्यास ही आत्महत्या की हत्या हे उजागर होणार आहे.
Rokhthok News