Home Breaking News पठारपूर शिवारात वाघाचा “मुक्तसंचार”

पठारपूर शिवारात वाघाचा “मुक्तसंचार”

651
C1 20240404 14205351

शेतात आढळले “पगमार्क”

तालुक्यातील गाव खेड्यात सध्या वाघ आले वाघ सुरू आहे. शेत शिवारात होत असलेल्या वाघाच्या दर्शनाने शेतकरी शेतमजूर भयभीत झाले असतांनाच आता पठारपूर शिवारातील शेतात वाघाचा पावलांचे ठसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शेतशिवारात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यात वारंवार वाघाचे जनावरांवर होत असलेले हल्ले शेतकऱ्यानं साठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्याच महिन्यात दोन शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडशा वाघाने पडला होता. तर शेतात जाणाऱ्या युवकाला वाघ आडवा झाल्याने त्याला झाडावर चढावे लागले होते.
तालुक्यातील पठारपूर माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे गाव आहे. काल रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला होता. आज सकाळी गजानन काळे हे शेतात गेले होते तेव्हा त्यांना पंजाचे ठसे आढळून आले. त्यांनी याचे निरीक्षण केले असता ते वाघाचा पावलांचे ठसे असल्याचे कळले. वाघ रात्री पठारपूर शेत शिवारात फिरला होता. काळे यांचे शेत गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी: बातमीदार