Home Breaking News Accident : महिला घटनास्थळीच ठार

Accident : महिला घटनास्थळीच ठार

● लालपुलिया परिसरात घडली घटना

4105
C1 20240206 12174808

लालपुलिया परिसरात घडली घटना

Accident News : उप विभागात अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. अस्ताव्यस्त वाहतूक याला कारणीभूत ठरताहेत. मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या यात 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला आहे. A 52-year-old woman died in a two-wheeler collision

सुनंदा उत्तम रामटेके (52) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील निवासी असून दोन दिवसांपूर्वी मुलगा गौरव सोबत दुचाकीने पांढरकवडा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. आपल्या राजुरा या गावी परतत असताना लालपुलिया परिसरात समोरून येणारी भरधाव दुचाकी धडकली.

या घटनेत सुनंदा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. अपघात घडताच प्रत्यक्षदर्शीनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवले. तर पोलिसांना सूचित करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News