Home Breaking News “तो”…रेतीघाट “त्‍या” लिलाव धारकालाच देण्‍याचा राजकीय घाट

“तो”…रेतीघाट “त्‍या” लिलाव धारकालाच देण्‍याचा राजकीय घाट

1373
C1 20240206 11270666

पाठबळ देणारा राजकीय पुढारी कोण ?

WANI NEWS : अहेरी- बोरगाव रेती घाटातून नियमबाह्य रेतीचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारावर महसूल विभागाने 7 जुन 2023 ला कारवाई केली होती. यावेळी दोन हायवा व एक पोकलेन मशिन ताब्‍यात घेण्‍यात आली होती. तेव्‍हा पासुन तो रेतीघाट बंदावस्‍थेत आहे माञ त्‍याच लिलाव धारकांला तो घाट मिळावा याकरीता राजकीय घाट घातल्‍या जात आहे. Two Hivas and one Poklen machine were seized.

रेती तस्करीवर आळा बसावा व ग्राहकांना स्वस्तदरात रेतीचा पुरवठा व्हावा याकरिता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाच्या अखत्यारीत रेतिघाटाचा लिलाव करून डेपोतून नोंदणीकृत ग्राहकांना रेतीचा पुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले. तर विहित घाटावरून रेतीचे नियमानुसार उत्खनन करून डेपोत साठवणूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्या लिलावधारकावर दंडात्मक कारवाई
बोरगाव-अहेरी रेती घाटात हायवा व पोकलेन मशीन आढळून आली होती. यामुळे रेतिघाटाच्या लिलावधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. नव्याने तो रेती घाट त्यालाच देण्यात येणार का ? याबाबत माहिती नसून खनिकर्म विभाग, महसूल प्रशासनाचा अभिप्राय घेतील तसेच त्या लिलावधारकावर कालांतराने क्रिमिनल ओफेन्स दाखल झाल्यामुळे सर्व बाबी पडताळणे महत्वाचे आहे.
निखिल धुळधर
तहसीलदार, वणी

तालुक्‍यातील बोरगांव- अहेरी घाटातुन माञ नियमांना तिलांजली देत रेतीचे उत्‍खनन अवैद्यरित्या होत असल्‍याची बाब समोर आली. महसुल प्रशासनाच्‍या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत घाटातील दोन हायवा ट्रक व एक पोकलेन मशिन ताब्‍यात घेतल्‍याची घटना उघडकीस आली होती तेव्‍हा पासुन संबधीत रेतीघाट बंदावस्‍थेत आहे.

अहेरी- बोरगाव येथील घाटाचा लिलाव करण्यात आला होता तर ब्राम्हणी येथे रेती डेपोची निश्चिती करण्यात आली होती. रेती घाटातून रेतीचे उत्खनन करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली  आहे. मजुरांच्या साह्याने रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच डेपोत रेतीची साठवणूक कारावी लागते. तसेच नोंदणीकृत ग्राहकाला नियमानुसार रेतीचा पुरवठा करावा लागतो.

भुरकी रेती घाटावर अनागोंदी
तालुक्‍यातील वर्धा नदिवरील भुरकी रेती घाट सुरु आहे. परंतु तेथे सुध्‍दा कमालीची अनागोंदी निर्माण झाल्‍याची चर्चा रंगत आहे. घरकुल धारकांना निकृष्‍ट दर्जाची रेती मिळत असल्‍याची ओरड सुरु आहे. तर जादादराने चांगल्‍या दर्जाच्‍या रेतीची विक्री होत असल्‍याचे वास्‍तव उजागर होत आहे. राञीच्‍या सुमारास धावणाऱ्या वाहनांचे जीपीएस (GPS) आणि घाटावरील सीसीटिव्‍ही (CCTV) फुटेजची तपासणी जिल्‍हाधिकारी यांनी केल्‍यास मोठे घबाड बाहेर येणार असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.
ROKHTHOK NEWS