Home Breaking News दुचाकीचा अपघात, दोघे विद्यार्थी ठार

दुचाकीचा अपघात, दोघे विद्यार्थी ठार

● गणेशपुर खडकी शिवारातील घटना

4277
C1 20240306 11531731
C1 20240404 14205351

गणेशपुर खडकी शिवारातील घटना

Accident News | मोहदा येथे वास्‍तव्‍यास असलेला विद्यार्थी आपल्‍या मिञाला तेजापुर या गावी सोडण्‍यास जात असतांना गणेशपुर खडकी शिवारात पल्‍सर दुचाकीचा भिषण अपघात झाला. राञीच्‍या अंधारात रस्‍त्‍याने जात असलेली म्‍हैस अचानक दुचाकीच्‍या समोर आली. धडक जबर होती या अपघातात दोघांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी मध्‍यराञी एक वाजताच्‍या सुमारास घडली. Both died on the spot in the accident due to the force of the impact.

गणेश कैलास टेकाम (18) राहणार मोहदा ता. वणी व रोहित मरसकोल्‍हे (18) राहणार तेजापुर असे दुर्दैवी मृतक विद्यार्थ्यांची नांवे आहेत. गणेश हा बारावीची परिक्षा  देत होता. पेपर संपल्‍यानंतर त्‍यांने मिञाची पल्‍सर दुचाकी क्रमांक MH-49-AX-2895 ही घेतली व रोहित सोबत मंगळवारी राञी 11 वाजता गावी जाण्‍यास निघाला. दोघे सर्वप्रथम मोहदा येथे पोहचले त्‍यानंतर मिञाला तेजापुर येथे सोडण्‍यास जात असतांना गणेशपुर शिवारात अनर्थ घडला.

मध्‍यराञी दुचाकीने भरधाव जात असतांना त्‍यांना रस्‍त्‍याने जात असलेली म्‍हैस दिसली नाही. दुचाकी थेट म्‍हशीवर धडकली यामुळे दुचाकीस्‍वार विद्यार्थी रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या खड्ड्यात कोसळले. गंभीर दुखापत झाली होती, मोठया प्रमाणात रक्‍तस्‍ञाव झाला तसेच ते राञभर तेथेच पडून राहिल्‍याने त्‍यांना वेळेवर उपचार मिळू शकला नाही यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला.

बुधवारी पहाटे प्रत्‍यक्षदर्शींना झालेल्‍या अपघाताची माहिती मिळाली. पोलीसांना सुचना देण्‍यात आली असुन मुकूटबन पोलीस तातडीने घटनास्‍थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करण्‍यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. अपघात प्रचंड भीषण होता म्हशीला सुध्दा मोठया प्रमाणात मार लागला आहे.
Rokhthok News