Home Breaking News SAD NEWS: तरुणाने गळफास घेत संपवले जीवन

SAD NEWS: तरुणाने गळफास घेत संपवले जीवन

● मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

2185
C1 20240306 08115932
C1 20240404 14205351

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

Sad News Wani | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोर्ली येथे 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत जीवन संपवले. ही घटना मंगळवार दिनांक पाच मार्चला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. A 24-year-old youth ended his life by hanging himself.

स्वप्नील प्रकाश आडे (24) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह डोर्ली या गावात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी घरात कोणीच नसल्याची संधी साधून त्याने राहत्या घरी घेतला गळफास घेतला. ही बाब घरच्या मंडळींना कळताच एकच कल्लोळ माजला.

गळफास घेतल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली, नागरिकांनी शिरपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News