Home क्राईम महिलेवर वारंवार अत्‍याचार, आरोपी ताब्‍यात

महिलेवर वारंवार अत्‍याचार, आरोपी ताब्‍यात

● तो नेहमीच मिञाच्‍या घरी येत असल्‍याने पिडीता व त्‍याच्‍यात ओळख निर्माण झाली ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि.....

4006

वणी पोलीसात गुन्‍हा नोंद

Crime News Wani | तालुक्‍यातील एका गावात 27 वर्षीय तरुणांचे आपल्‍याच मिञाच्‍या 28 वर्षीय पत्‍नी सोबत सुत जुळले. प्रेम बहरत असतांना त्‍यांने तिला लग्‍नाचे आमिष दाखवत वारंवार अत्‍याचार केला. आपली फसवणुक होत असल्‍याचे लक्षात येताच त्‍या पिडीतेने थेट पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी गुन्‍हा नोंद केला आहे. The victim directly reached the police station and filed a complaint and the police registered the crime.

सुरज सुनिल पावडे (27) असे ताब्‍यातील आरोपींचे नांव आहे. तो तालुक्‍यातील नदीतिरावरील एका गावात वास्‍तव्‍यास आहे. त्‍याच गावात पिडीता सुध्‍दा आपल्‍या परिवारांसह राहत होती. तिचा पती व सुरज हे दोघे मिञ असल्‍याने त्‍यांचे एकमेकांच्‍या घरी येणे- जाणे होते.

आरोपी हा नेहमीच मिञाच्‍या घरी येत असल्‍याने पिडीता व त्‍याच्‍यात ओळख निर्माण झाली ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मिञ घरी नसतांना सुध्‍दा भेटीगाठी व्‍हायला लागल्‍या. प्रेम बहरत असतांना त्‍याने तिला लग्‍नाचे आमिष दाखवले व वारंवार तो तिच्‍या सोबत सबंध प्रस्‍तापीत करत होता. माञ तिने लग्‍नाची गळ घालताच “तो मी नव्‍हेच” अशी भुमीका त्‍यांने घेतली.

या प्रकरणी पिडीतेने आपल्‍यावर अन्‍याय होत असल्‍याने पोलीसात धाव घेतली. पोलीसांनी भादवि कलम 376 अन्‍वये गुन्‍हा नोंद केला. तर आरोपीला ताब्‍यात घेतले आहे. पुढिल तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News