Home Breaking News भीषण अपघातात दोघे जखमी

भीषण अपघातात दोघे जखमी

188

*बोलेरो व दुचाकींची जबर धडक

*जखमींना चंद्रपूर ला हलवले

मारेगाव (बोटोनी)-राहुल आत्राम: मारेगाव- वणी मार्गावरील पेट्रोल पंप जवळ बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारार्थ त्यांना तातडीने चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान घडली.

प्रवीण अशोक पारखी (28) चिखल वनोजा ता. वरोरा व विठ्ठल रामदास जीवतोडे (46) दहेगाव(कुंभा) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी ते दोघे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. अंत्यसंस्कार आटोपून होंडा शाईन दुचाकी क्रमांक  MH-34- BQ- 2765 ने पेट्रोल पंपाकडे जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या बोलेरो MH-34-K- 6516 ने जबर धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.