Home राजकीय बेकायदेशीर अटक आणि पोलिसांचे गैरवर्तन..!

बेकायदेशीर अटक आणि पोलिसांचे गैरवर्तन..!

647
Img 20240613 Wa0015

त्या…घटनेचा तीव्र निषेध

उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी या गावात शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आला. पीडित परिवाराला भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची बेकायदेशीर अटक करण्यात आली. याप्रसंगी पोलिसांनी गैरवर्तन केल्याने लोकशाहीला काळिमा फसल्याचा आरोप वणी काँग्रेस कमिटीने केला असून त्या…घटनेचा तीव्र निषेध नोंदवत SDO मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

घडलेल्या अमानुष घटनेनंतर त्या ठिकाणी पीडित परिवाराला भेटण्यासाठी काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी ह्या जात असतांना त्यांची अडवणूक केली. त्यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केले आणि बेकायदेशीर अटक केली.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे हे कृत्य हुकूमशाही प्रमाणे असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेचा वणी काँग्रेस कमिटीने निषेध नोंदवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्च काढला. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून SDO यांचे मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रमोद वासेकर, प्रमोद निकुरे, राजाभाऊ पाथरडकर, रफिक रंगरेज, संतोष पारखी, इजहार शेख, मंदा बांगरे, प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे, सुधीर खंडाळकर, महादेव दोडके यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी: बातमीदार

C1 20240529 15445424