Home Breaking News ‘रंगनाथ’च्या पुनरावृत्तीचेच संकेत, सभासदच उतरले रणांगणात…!

‘रंगनाथ’च्या पुनरावृत्तीचेच संकेत, सभासदच उतरले रणांगणात…!

414
C1 20240404 14205351

सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढत
आज मतदानातून ठरणार वसंतचे भवितव्य

रोखठोक | वणी मतदारसंघातील सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वसंत जिनिंग ची निवडणूक होत आहे. रविवार दि. 6 नोव्हेंबरला तब्बल अकरा हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत आपापसात लढणारे बलाढ्य उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने वसंतचे भविष्य मतदानातून ठरणार आहे.

दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेडच्या मावळत्या अध्यक्षासह आजी-माजी आमदार एकमेकांसमोर निवडणूक रणसंग्रामात उभे ठाकले आहेत. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढत होत असली तरी आज होणारे मतदान निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.

वसंत जिनिंग चे मावळते अध्यक्ष ऍड. देविदास काळे जय सहकार पॅनल च्या माध्यमातून तडफदार उमेदवारांसह रिंगणात उतरले आहेत. परंतु स्व:पक्षात वरचढ होत असल्याचा ग्रह, जेष्ठ नेत्यांना झाल्यामुळे वेळोवेळी विरोधाची भूमिका घेत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. ‘रंगनाथ’च्या निवडणुकीत जो ‘रिझल्ट’ आला त्याचीच पुनरावृत्ती होणार का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही सहकार क्षेत्रातील संस्थेची प्रगती, आर्थिक भरभराट, कार्यरत कर्मचाऱ्यांचे नियमित मिळणारे वेतन, सर्वसमावेशक निर्णय घेताना जपण्यात आलेले संस्थेचे हित, याकरिता संचालक मंडळांनी घेतलेले निर्णय आणि प्राप्त केलेली उन्नती महत्वाची आहे. एकेकाळी कर्मचाऱ्यांचा पगार करताना नाकीनऊ येत होते, त्याच संस्थेत आर्थिक स्त्रोत निर्माण करून अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आणल्याचे सभासद विसरणार का ? हे मतदानातून अधोरेखित होणार आहे.

वसंत जिनिंगच्या निवडणुकीत बलाढ्य नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, प्रत्येक पॅनल मध्ये असणारे मातब्बर उमेदवार यामुळे ही निवडणूक अटीतटीची व तुल्यबळ होणार आहे. विद्यमान व माजी आमदार सत्तास्थापन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताहेत. काही उमेदवार स्वबळावर निवडून येतील मात्र सत्ताधारी कोण हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार