Home क्राईम Crime : टिळक चौकात धारदार हत्यारासह धुमाकूळ

Crime : टिळक चौकात धारदार हत्यारासह धुमाकूळ

● दोघे ताब्यात, डीबी पथकाची कारवाई

2463
C1 20231106 19054954
C1 20240404 14205351

दोघे ताब्यात, डीबी पथकाची कारवाई

Crime News Wani | हातात धारदार तलवार आणि सत्तुर घेऊन धुमाकुळ घालत असलेल्या दोन टवळखोरांच्या मुसक्या डीबी पथकाने आवळल्या. ही घटना सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर ला दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. The DB team arrested the two who were carrying a sword and sattur

शैलेन्द्र उर्फ शंकर साईनाथ बावने (25) रा. चिंचोली ता. राजुरा जि. चंद्रपुर व बादल राजेश दुपारे (25) रा. कोंढाण्यवाडी वणी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. सोमवारी ते दोघे धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली होती.

टिळक चौकातील वन विभागाच्या कार्यालयासमोर डीबी पथकाने धाव घेतली. अटक चुकवण्याचा ते प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. यावेळी त्यांचे जवळून धारदार पात्याची तलवार, टोकदार निमुळता सत्तुर व दुचाकी तसेच त्या दोघांना ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्यात आला.

याप्रकरणी दुचाकी क्रमांक MH-34- AW- 3827 व धारदार तलवार आणि सत्तुर जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किद्रे, ठाणेदार पोलीस निरिक्षक अजित जाधव यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकचे API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसिम, गजानन कुडमेथे यांनी केली.
ROKHTHOK NEWS