Home Breaking News सराईत चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या ‘मुसक्या’

सराईत चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या ‘मुसक्या’

355
Img 20240613 Wa0015

● तीन दिवसापूर्वी फोडले होते शिक्षकाचे घर

वणी: तीन दिवसापूर्वी गौरकार ले आऊट परिसरातील बंदावस्थेत असलेल्या घराला लक्ष करत घरफोडी करण्यात आली होती. त्या सराईत चोरट्याच्या मुसक्या अवळण्यात वणी पोलिसांना यश आले आहे.

राजु पुरूषोतम पोटे (48) हा नवीन लालगुडा येथील निवासी असून तो सराईत चोरटा आहे. त्याचे शिरावर अनेक गुन्ह्याची नोंद वणी पोलिसात आहे. तीन दिवसापूर्वी गौरकार लेआउट परिसरातील शिक्षक कुंतलेश्वर नागोराव तुरविले यांचे बंदावस्थेतील घराला लक्ष्य करत 16 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना 3 मार्चला उजागर झाली होती.

शिक्षक तुरुविले हे महाशिवरात्री निमित्ताने गावी गेलेले असताना चोरट्याने संधी साधली. रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार शाम सोनटक्के यांनी तातडीने गोपनीय माहितगाराच्या मदतीने फास आवळला.

पोलिसांनी आरोपीचा माग काढत मुसक्या आवळल्या. त्यांचेकडून रोख दोन हजार 270 रुपये व दोन मोबाईल संच असा तीन हजार 170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, SDPO संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, बिट जमादार विठठल बुरेवार, सचीन मडकाम, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
वणी: बातमीदार

C1 20240529 15445424