Home Breaking News ..तंतोतंत मंत्र, “एक लोटा जल सब समस्या का हल”

..तंतोतंत मंत्र, “एक लोटा जल सब समस्या का हल”

● वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन ● रुद्राक्ष महादेव वनांचे भूमिपूजन उत्साहात

1194
C1 20240307 18523239

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
रुद्राक्ष महादेव वनांचे भूमिपूजन उत्साहात

Wani News : वृक्षसृष्टी हीच जीवसृष्टी आहे झाडाला एक लोटा जल टाकलं तर सर्व समस्यांचं हल तेथूनच निघतो. वृक्ष असेल तर जल आहे आणि जल असेल तर वृक्ष तरच मनुष्याचा कल आहे असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रुद्राक्ष महादेव वनांचे भूमिपूजन सोहळ्यात गुरुवार दिनांक 7 मार्चला निंबाळा येथे केले. Forest Minister Sudhir Mungantiwar performed Bhoomipujan of Rudraksh Mahadev Forest.

काही दिवसांपूर्वी वणी परिसरात काशी महा शिवपुराण कथा संपन्न झाली. या कथेला उपस्थिती दर्शवावी याकरिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व लोकसभा प्रभारी रवी बेलूरकर यांनी आमंत्रण दिले. कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा लाखो भाविक भक्तांना सांगायचे “एक लोटा जल सब समस्या का हल.” त्यावेळी हा मंत्र वन विभागासाठी तंतोतंत लागू होतो असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

शिवकथे दरम्यान रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यान साकारण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. याकरिता आमदार बोदकुरवार यांनी निंबाळा हद्दीतील वन जमिन उपलब्ध असल्याचे सांगितले. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्या प्रस्तावानुसार वणीजवळील निंबाळा (रोड) येथील जागेची निवड करण्यात आली. याकरिता 11 कोटी 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आणि अल्पावधीतच भूमिपूजन सोहळा पार पडला.

आयोजित कार्यक्रमाला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, उपवनसंरक्षक (प्रादे.) पांढरकवडा किरण जगताप, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, गजानन विधाते, डॉ. मंगेश धुरवाडे, विनोद मोहितकर यांची उपस्थिती होती.
Rokhthok News