Home Breaking News महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, ऑटो चालक गंभीर

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, ऑटो चालक गंभीर

● अपघातातील मृतांचा आकडा झाला तीन

2156

अपघातातील मृतांचा आकडा झाला तीन

रोखठोक | वणी वरून शिंदोला येथे प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटोला ट्रक ने जबर धडक दिली होती. या अपघातात आई व पाच वर्षीय चिमुकली घटनास्थळीच दगावले होते. जखमींना उपचारार्थ हलविण्यात आलेले असताना रात्री 9 वाजताच्या दरम्यान 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर ऑटो चालक मृत्यूशी झुंज देत आहे. The woman injured in that accident died while the auto driver is battling death.

दर्शना प्रकाश मडावी (35) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या पती प्रकाश मडावी यांचेसह मुलीच्या लग्नाची पत्रिका घेवून शिंदोला येथील नातेवाईकांकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

वणी येथून सात ते आठ प्रवाशी ऑटो क्रमांक MH- 29- AM- 0013 मध्ये बसून शिंदोला येथे जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणारा ट्रक क्रमांक HR-58 -C – 0482 ने ऑटोला जबर धडक दिली होती. या घटनेत संजीवनी अनंत नागतुरे (35) व अवनी अनंत नागतुरे (5) ह्या मायलेकी घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या होत्या.

या भीषण अपघातातील गंभीर जखमी दर्शना प्रकाश मडावी (35), प्रकाश मडावी (43) रा. गडचिरोली व ऑटो चालक संजय बोंडे (45) रा. शिंदोला यांना प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील दर्शना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.
वणी : बातमीदार