Home वणी परिसर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

59

वणी: छत्रपती महोत्सव समिती, गणेशपुर च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छत्रपती स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्य गणेशपुर ग्रामपंचायतीचे सचिव मिलिंद माने यांचा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी छत्रपती महोत्सव समितीचे गणेश काकडे, विवेक ठाकरे, गजानन चंदावार, प्रशांत काळे, स्वप्नील थेरे यांचे सोबत सरपंच तेजराज बोढे, उपसरपंच रवी काळे, अक्षय राजूरकर, विकास पेंदोर, बाबाराव गेडाम, गणेश चापरे, शुभम झाडे, राजू घाटे, सुभाष वैद्य, हरीश घाटे, गौरव चीकराम, रोशन काकडे, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे, प्रशांत नागतुरे, सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, शुभम भोंगळे, विशाल पेंदोर, निखिल येकरे, प्रवीण खानझोडे, भगवान मोहिते, राम मुडे, प्रणय इखारे यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार