Home वणी परिसर किन्हाळा शाळेतील शिक्षिकेंचा गौरव

किन्हाळा शाळेतील शिक्षिकेंचा गौरव

233

* म.फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमांची भेट

* शिक्षक दिनाचे औचित्य

मारेगाव: शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्हाळा येथील पालकांनी म.फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमांची भेट देऊन कार्यरत दोन्ही शिक्षिकेंचा गौरव केला.

येथील शिक्षिका स्मिता देशभ्रतार (पुनवटकर) व चित्रा डहाके यांनी मागील तीन वर्षांपूर्वीपासून शाळेचा शैक्षणिक कायापालट करून कोरोना काळातही मुलांचा शैक्षणिक प्रवाह कायम ठेऊन सर्वांगीण सकारात्मक बदल केला. याची पालकांनी दखल घेत दोन्ही शिक्षिकेंना गौरविण्यात आले.

याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यांत आली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयार केलेले शुभेच्छापत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णुदास आडे होते तर नानाजी आसेकर, सरपंच शुभम भोयर, अरुण डांगाले, बंडू क्षीरसागर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. निमिषा देठे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन अमृता काकडे यांनी तर आभार स्वाती शास्त्रकार यांनी मानले.