Home Breaking News भ्रष्ट…..वेकोलीचा अभियंताच लाच मागतो तेव्हा…!

भ्रष्ट…..वेकोलीचा अभियंताच लाच मागतो तेव्हा…!

1613

बांधकामाचे देयक (bill) देण्यापूर्वीचा प्रताप

सुनील पाटील |: वेकोलीच्या अधिनस्त कार्यरत उप अभियंत्याने रस्ता बांधकाम करणाऱ्याला देयक (bill) अदा करण्यापूर्वी लाच मागितली. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराने सिबीआय (CBI) कडे तक्रार दाखल केली होती. शुक्रवार दि. 7ऑक्टोबर ला सायंकाळी सुंदरनगर येथील निवासस्थानी धाड टाकून 14 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.

बी. यु. वाघमारे असे लाच मागणाऱ्या उप अभियंत्याचे नाव आहे. वेकोलीच्या अधीन कार्यरत असताना निलजई, सुंदर नगर फिल्टर प्लांट मधील रस्ता बांधकाम केलेल्या कंत्राटदार अनिल कुमार सिंग यांना देयक (bill) अदा करण्यापूर्वी लाच मागितली. मात्र सातत्याने होत असलेल्या पैशाच्या मागणीने त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने CBI कडे तक्रार दाखल केली.

नागपूर येथील सीबीआय च्या पथकाने सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुंदरनगर येथील वाघमारे यांच्या निवासस्थानी धाड टाकली. यावेळी 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. वेकोलीत कमालीची अनागोंदी सुरू आहे, स्थानिक भूमिपुत्रांना डावलून मर्जीतील लोकांनाच विविध कंत्राट दिल्या जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

वेकोलीच्या माध्यमातून निर्माणाधिन रस्ते अतिशय निकृष्ट असल्याचे स्थानिकांनी अनुभवले आहेत. तीन महिन्यापूर्वी वेकोली च्या माध्यमातून कोलगाव ते पैनगंगा पुलापर्यंत बांधण्यात आलेला 2 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णतः उखडला आहे. निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने शासनाच्या किंबहुना वेकोलीच्या पैशाचा चुराडा झाला आहे.

चक्क अभियंत्यालाच लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे संपूर्ण वेकोली क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वृत्त लिहे पर्यंत सिबीआयची कारवाई सूरू असल्याची माहीती आहे. वेकोलीतील अशा अनागोंदी ला मुख्य प्रबंधक सर्वस्वी जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.
वणी: बातमीदार