Home सामाजिक लाखात एखादचं असतं “या” आजाराने ‘ग्रस्त’

लाखात एखादचं असतं “या” आजाराने ‘ग्रस्त’

635
C1 20240404 14205351

“आकृती” ला मदतीचा हात…
ओबीसी जातनिहाय जनगणना समिती सरसावली

तालुक्यातील ढाकोरी(बोरी) येथील गरीब शेतकरी वासुदेव कवरासे यांची मुलगी आकृती ही “जीबीएस” या दुर्धर आजाराने ग्रस्त होती. एक लाखामधून एका व्यक्तीस होणाऱ्या या आजारा बाबत कळताच ओबीसी जातनिहाय जनगणना समिती सरसावली असून ‘त्या’ बलिकेला 10 हजार रुपयांची मदत केली आहे.

समितीचे समनवयक नारायण मांडवकर यांना दुर्धर आजाराने ग्रस्त आकृती बाबत माहिती मिळाली. त्यांनी ओबीसी(व्हीजेएनटी, एसबीसी ) जातनिहाय जनगणना कृती समिती,वणी-झरी-मारेगाव च्या मंडळीला सांगितली आणि तिला मदत करण्यासाठी समितीने पुढाकार घेतला.

ढाकोरी येथे जाऊन समितीच्या सदस्यांनी आकृतीच्या प्रकृतीची विचारपूस करून तिची सांत्वना करण्यात आली. तिला आजारातून बरे होण्यासाठी मानसिक बळ व कुटुंबाला हिम्मत व आधार देण्यात आला.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवर,अशोक चौधरी, प्रा. बाळासाहेब राजूरकर, प्रा. अनिल टोंगे, सुरेश मांडवकर, प्रा. राम मुडे, नारायण मांडवकर, विकास चिडे आणि मोहन हरडे उपस्थित होते.
वणी: बातमीदार