Home Breaking News आणि….अखेरच्या टप्प्यात विमानाने घेतली ‘झेप’

आणि….अखेरच्या टप्प्यात विमानाने घेतली ‘झेप’

1884
C1 20240404 14205351

वसंत मध्ये परिवर्तन, कासावारांचा करिश्मा

रोखठोक | सहकार क्षेत्रातील महत्वाची असलेली वसंत जिनिंग अँड प्रेसिंगची संचालक पदाकरिता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मरेल याची उत्सुकता लागलेली असतानाच मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात विमानाने झेप घेत ‘वसंत‘ मध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले.

सहकार क्षेत्रात महत्वाची समजली जाणारी वसंत जिनिंगची निवडणूक पार पडली. सोमवारी सकाळी 8 वाजता पासून येथील शेतकरी मंदिरात मत मोजणीला सुरुवात झाली. 10 हजार 924 सभासद मतदार असलेल्या वसंत जिनिंग मध्ये 7 हजार 318 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वसंत जिनिंगमध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीत सुरवातीला मावळते सत्ताधारी ऍड. देविदास काळे यांच्या गटाचे उमेदवार आघाडीवर होते तर काही बुथवर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्रमांकावर वामनराव कासावार यांच्या गटाचे उमेदवार होते. प्रचंड अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत क्षणाक्षणाला चित्र बदलत होते.

मतमोजणी सुरू असताना तिन्ही गटाला विजयाची खात्रीच नाही तर अपेक्षा होती. मतमोजणी सुरू असताना सायंकाळी अचानक चित्र बदलले. झरी विभागातील सभासद मतदारांनी माजी आमदार कासावार यांच्या कार्यप्रणालीवर ‘विश्वास’ दर्शवत वसंत जिनिंग मध्ये पुर्णतः परिवर्तन घडवले. निवडणूक अधिकारी यांची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही मात्र सत्तांतर होणार हे निश्चित.
वणी : बातमीदार