Home Breaking News पुन्‍हा.. दोन दुकानांना चोरट्यांनी केले लक्ष, चोरटा सीसीटीव्हीत कैद

पुन्‍हा.. दोन दुकानांना चोरट्यांनी केले लक्ष, चोरटा सीसीटीव्हीत कैद

1840

तालुक्‍यात चोरीच्‍या घटनांत वाढ

रोखठोक | वणी पोलीस स्‍टेशन हददीत पुन्‍हा चोरटयांनी बंद घरे व दुकानांना लक्ष केल्‍याचे दिसत आहे. मागील आठवड्यात यवतमाळ मार्गावरील दुकानांचे शटर तोडून आपला पराक्रम दाखवला होता तीच कार्यपध्‍दती मंगळवार दि. 6 डिसेंबरला वरोरा मार्गावरील दोन दुकानात अवलंबण्‍यात आली. माञ तो चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

शहरात दोन महिन्या पूर्वी चोरींची शृंखला सुरु झाली होती. त्‍यावेळी बंद घरे व दुकाने चोरट्यांचा निशाण्यावर होती. आतासुध्‍दा तीच पध्‍दत अवलंबल्‍या जात असुन शहरातील दुकानांना टार्गेट करण्‍यात येत आहे. लहानसहान चोऱ्या बाबत दुकानदार तक्रार दाखल करतांना दिसत नाही किंबहुना दाखल केल्‍या जात नाही.

मागील आठवडयात बस स्थानक परिसर व साई मंदिर जवळील दोन दुकाने चोरट्यानी फोडल्याने चोरटे अजून शहरात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सातत्याने होत असलेल्या चोरी, घरफोडी मुळे चोरटयांचा सुरु असलेला हैदोस भय निर्माण करणारा आहे.

मंगळवारी राञी वरोरा मार्गावरील टिळक महाविद्यालयालगत असलेल्‍या लोकमान्य बुक डेपो मध्‍ये चोरटयाने शटर तोडून प्रवेश केला. ही बाब सकाळी उघडकीस आली. तर सिध्‍दी विनायक मंगल कार्यालयालगतच्‍या दुकानाचे शटर तोडून चोरटयांने मिळेल तो ऐवज लंपास करुन आपले इस्पित साध्‍य केले. परंतु यावेळी दुकानात लावण्‍यात आलेल्‍या सीसीटिव्‍ही फुटेज मध्‍ये चोरटा कैद झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून शहरात चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. अदयाप चोरीच्‍या घटनेतील चोरटा पोलीसांच्‍या हाती लागला नाही. दोन दिवसांपुर्वी शेतातील गोठयात ठेवण्‍यात आलेल्‍या कापसावर चोरटयाने हात साफ केला होता. त्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

पोलीसांनी राञपाळीत गस्‍त वाढवण्‍याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी राञी वरोरा मार्गावरील दुकानातील चोरीच्‍या घटनांत किती मुददेमाल लंपास करण्‍यात आला याबाबत तपास सुरु असुन अद्याप गुन्‍हा नोद करण्‍यात आला नाही.
वणीः बातमीदार

Previous articleतो….नरभक्षी वाघ अखेर जेरबंद
Next articleन्यायालयाने ठोठावली 44 जणांना शिक्षा
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.