Home Breaking News डॉ. जाकीर हुसेन यांची जयंती साजरी

डॉ. जाकीर हुसेन यांची जयंती साजरी

135

सेवादल कॉंग्रेस कमिटीतर्फे अभिवादन

वणी : शहर सेवादल काँग्रेस कमिटी च्या वतीने डॉ. जाकीर हुसेन यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्याम टॉकीज चौक येथे डॉ. जाकिर हुसेन यांच्या फलकाला जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस इजहार शेख यांनी हारार्पण करून अभिवादन केले.

भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून स्व. डॉ.जाकिर हुसेन यांनी देशाचे काम पाहिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग टोंगे, सेवादल चे शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे, नईम अजीज, सलीम खान सुलेमान खान, सईद खान, इरफान सय्यद, रवि गुप्ता, मारोती मांडवकर, राजू अडकिने, जावेद खान, संदीप मुत्यालवर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार