Home वणी परिसर क्रांती युवा संघटनेचा मतदारसंघात ‘धडाका’

क्रांती युवा संघटनेचा मतदारसंघात ‘धडाका’

532

तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

वणी: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या क्रांती युवा संघटनेने वणी विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीचा धडाका लावला आहे. वणी, मारेगांव व झरी -जामनी तालुक्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करून संघटनेला बळकट करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी झटताहेत.

क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेश ओमप्रकाश खुराणा, जिल्हा अध्यक्ष अविनाश भुजबळराव , विधानसभा अध्यक्ष ॲड. सूरज महारतळे व मुख्य सल्हागार निलेश कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय नियुक्त्या करण्यात येत आहे.

वणी तालुका अध्यक्ष म्हणून आयुष ठाकरे तर वणी शहर अध्यक्ष म्हणून राजू गव्हाणे यांची निवड करण्यात आली. तसेच मारेगाव तालुका अध्यक्ष म्हणून रवींद्र पोटे तर मारेगाव शहर अध्यक्ष म्हणून धीरज डागांले तर झरी -जामनी तालुका अध्यक्ष म्हणून रवींद्र तावाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संजय पोपली, गौरी खुराणा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार