Home Breaking News चोरट्यांची शक्कल, बंडा कुलूपबंद आणि कापुस ‘लंपास’

चोरट्यांची शक्कल, बंडा कुलूपबंद आणि कापुस ‘लंपास’

2508

तीन दिवसात दोन वेळा चोरी
वीस क्विंटल कापुस लांबवला

रोखठोक | तालुकयातील नांदेपेरा शिवारात शेतातील बंडयातुन तीन दिवसात दोन वेळा चोरी करुन तब्‍बल विस क्विंटल कापुस लंपास करण्‍यात आला. परंतु चोरटयांने नामी शकल अवलंबत बंड्याचे कुलूप न तोडता कापुस लांबवल्‍याने पोलीसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

नांदेपेरा शिवारात अशोक खामनकर व त्यांच्या पत्‍नी वर्षा अशोक खामनकर यांच्या नांवे 13 एकर शेत आहे. त्‍यांचे वास्‍तव्‍य वणीतील गायकवाड फैल येथे असुन शेतीच्‍या वहिती करीता सालगडी नामदेव जिवतोडे यांना ठेवण्‍यात आले आहे. यावर्षीच्‍या हंगामात वेचणी केलेला 40 क्विंटल कापुस शेतातील बंडयात ठेवण्‍यात आला आणि बंडा कुलूपबंद करण्‍यात आला होता.

रविवारी मध्‍यराञीच्‍या दरम्‍यान शेतातील बंडयातुन पाच ते सहा क्विंटल कापुस चोरीला गेल्‍याचे सालगडयाने दुसऱ्या दिवशी दुपारी खामनकर यांना सांगीतले. शेतमालक शेतात पोहचले असता त्‍यांना बंडा कुलूप बंद अवस्‍थेत दिसला माञ कापुस चोरीला गेल्‍याचे लक्षात आल्‍याने त्‍यांनी आजुबाजुला कापसाची पाहणी केली व त्याच दिवशी जुने कुलुप काढून त्या ठिकाणी नविन कुलुप लावले.

याप्रकरणी पोलीसात तक्रार करण्‍यासाठी शेतमालक खामनकर तयारीत असतांना त्‍यांनी प्रथमतः गावात चौकशी केली व दुसऱ्या दिवशी खातरजमा करुनच तक्रार करण्‍याचे त्‍यांनी ठरवले असतांनाच 7 फेब्रुवारीच्‍या मध्‍यराञी पुन्‍हा चोरटयांनी डाव साधला आणि कुलूप न उघडताच बंडयातील जवळपास 15 क्विंटल कापुस पुन्‍हा लांबवला.

बुधवार दि. 8 फेब्रुवारीला पुन्‍हा सकाळी सालगडी जिवतोडे यांनी फोन करुन शेतमालकाला चोरी झाल्‍याचे सांगीतले. शेतात जावुन पाहणी केली असता पुन्‍हा बंडयाचे कुलूप व्‍यवस्थित लावून असल्‍याचे दिसल्‍याने त्‍यांनी शेतशेजारी रवि विधाते व पुरुषोत्म ठावरी यांना बोलावून पाहणी केली असता बंडयाच्‍या अवतीभोवती कापुस पडलेला दिसला व चारचाकी वाहनाच्‍या चाकाचे निशान दिसुन आले. खामनकर यांनी याप्रकरणी पोलीसात रितसर तक्रार दाखल केली असुन चोकशीअंती गुन्‍हा नोंद करण्‍यात येणार आहे.
वणीः बातमीदार