Home Breaking News दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, घटनास्थळीच मृत्यू

दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, घटनास्थळीच मृत्यू

● मुकुटबन मार्गावरील घटना

2219
C1 20240404 14205351

मुकुटबन मार्गावरील घटना

Accident news : रोखठोक | कोळसा वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने 50 वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना मुकुटबन मार्गावर रविवार दि. 7 मे ला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडली. Bike rider crushed by truck, died on the spot

संजय गोयनका (50) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. ते मंगलम पार्क परिसरात वास्तव्यास होते. कोल डेपो मधील कर्तव्य आटोपून ते आपल्या दुचाकीने घरी परतत असताना मुकुटबन मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH- 29- BE- 6155 ने दुचाकीला जबर धडक दिली.

अपघात प्रचंड भीषण होता, या घटनेत अक्षरशः दुचाकीस्वार चिरडल्या गेले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून उत्तरीय तपासणी नंतर नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कारताहेत.
वणी: बातमीदार