Home Breaking News ग्रामस्थांनी केला राजूर रिंग रोडवर ‘रास्तारोको’

ग्रामस्थांनी केला राजूर रिंग रोडवर ‘रास्तारोको’

548
Img 20240613 Wa0015

रेल्वे अधिकाऱ्यांनी मागितला 7 दिवसांचा अवधी

वणी : ग्रामसभेची परवानगी न घेता कोळसा सायडिंग सुरू करण्यात आली. यामुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याने कोळशाची रेल्वे सायडिंग बंद करून गावापासून दूर नेण्यात यावी अशी मागणी करत बुधवार दि. 8 जूनला ग्रामस्थांसह राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने रिंग रोड वर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी 7 दिवसाच्या अवधी मागितला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतची आत्मा आहे ग्रामसभा! ग्रामसभेच्या अधिकार हा सर्वोपरी व सार्वभौम असल्याने गावात कोणताही उद्योग स्थापित करण्यापूर्वी त्याची परवानगी आवश्यक असते. आणि हीच परवानगी न घेता येथील कोळसा सायडिंग सुरू करण्यात आली आहे.

कोणताही उद्योग स्थापित करताना प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करावे लागते. परंतु त्या नियमाची अवहेलना होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून धूलिकण प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. गावातील घरांमध्ये कोळशाची भुकटी चा शिरकाव होत असल्याने घरातील साहित्य मातीमोल होत आहे.

ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्याय विरोधात अनेक वेळा निवेदने व तक्रारी करण्यात आल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही. शेवटी त्रस्त जनतेने राजूर बचाव संघर्ष समितीचे बॅनर खाली एकत्र येत निर्वाणीचा इशारा देण्यासाठी बुधवारी राजूर रिंग रोडवर रास्ता रोको केला यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी 7 दिवसांचा अवधी मागितला आहे.

आंदोलनाचे नेतृत्व राजूर बचाव संघर्ष समितीने केले. याप्रसंगी संघदीप भगत, सरपंच विद्या पेरकावार, अशोक वानखेडे, वसुंधरा गजभिये, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, प्रणिता मो. अस्लम, डॅनी सॅन्ड्रावार, नंदकिशोर लोहकरे, अनिल डवरे, राहुल कुंभारे, साजिद खान, जयंत कोयरे, रफिक सिद्दीकी, अमृत फुलझेले, प्रकाश तालावर,रतन राजगडकर, जगदीश पाटील, सुरज यादव,कन्हैय्या कल्पूलवार, एड.अरविंद सिडाम, श्रावण पाटील, मो. खुसनुर, सुशील अडकीने, शैलेश मेश्राम, लीलाधर आरमोरीकर यांची उपस्थिती होती.
वणी: बातमीदार

C1 20240529 15445424