Home वणी परिसर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिलांचा गौरव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिलांचा गौरव

● राजुर ग्रामपंचायतीत पार पडला सोहळा

300

राजुर ग्रामपंचायतीत पार पडला सोहळा

Social news wani : महिला व बालविकास विभागाच्‍या वतीने ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” देण्‍यात येतोय.  तालुक्‍यातील राजुर कॉलरी ग्रामपंचायतीत बुधवारी सामाजीक क्षेञात योगदान देणाऱ्या महिलांना  “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर”  यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन्‍मानपञ व गौरवचिन्‍ह देवून सन्‍मानित करण्‍यात आले. Women who contributed in the social field were honored by giving honors and medals on the occasion of the birth anniversary of “Punyashlok Ahilya Devi Holkar”.

आयोजीत कार्यक्रमांत  प्रणिता मो. असलम, दीपाली अनिल सातपुते, निर्मला राजू मिलमिले, प्रतिमा मनोज कवाडे, रेखा नामदेव पुसदेकर, सविता अरुण येलादे,  नंदा राजेंद्र वाळके, दुर्गेशनंदा अर्जुन उदंटीवार,  मरिया दानियल पेरकावार, जया बाबूलाल नगराळे,  सरोज शंकर वरपटकर, सुनीता राहुल कुंभारे,  वर्षा धर्मेंद्र धोटे,  सुकेशनी संघपाल धाबर्डे, रजनी महादेव धोटे,  ज्योती रजनीश वेले, अर्चना विठ्ठल कडुकर, सुनीता प्रमोद झाडे, दुर्गा रवींद्र आत्राम या महिलांना सन्‍मानित करण्‍यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर Punyashlok Ahilya Devi Holkar पुरस्‍कारांचे मानकरी सामाजीक क्षेञात अग्रेसर आहेत. विविध समाजपयोगी उपक्रम सातत्‍याने राबवत असतात त्‍यांच्‍या कार्याची दखल ग्रामपंचायतीने घेतली आहे. यावेळी सरपंच विद्या डेव्हीड पेरकावार, उप सरपंच अश्विनी प्रकाश बलकी, ग्रामपंचायत सदस्‍या वंदना विजय देवतळे, ग्राम सचिव महेंद्र चहानकर व गावातील मान्‍यवर नागरीक उपस्थित होते.
Rokhthok News