Home Breaking News PSI प्रवीण हिरे व आशिष झिमटे यांची बदली

PSI प्रवीण हिरे व आशिष झिमटे यांची बदली

● वणी ठाण्‍यात कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची धडपड सुरू असते.

1377

नवे फौजदार होणार दाखल

Police Administration News | यवतमाळ जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या/नेमणुकांचे सत्र सुरू आहे. वणी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस उप निरीक्षक (PSI) प्रवीण हिरे व आशिष झिमटे यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. तर सपोनि (API) माया चाटसे व शिरपूर ठाण्यातील PSI रामेश्वर कांदुरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. Police Sub Inspector (PSI) Praveen Hire and Ashish Zimte have been transferred elsewhere.

यवतमाळ जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा-1951 मधील कलम 22(N) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या / नेमणूका बाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

वणी पोलीस ठाण्यात योग्यरीत्या कर्तव्य बजावणारे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देविदास हिरे यांना लोहारा पोलीस ठाणे तर पोलीस उपनिरीक्षक आशिष किसनराव झिमटे यांना वसंतनगर पोलीस ठाण्यात प्रशासकीय कारणास्तव तात्पुरता स्वरूपात बदली/नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील महत्‍वपुर्ण पोलीस ठाणे म्‍हणुन संपुर्ण राज्‍यात वणीची ओळख अधोरेखीत झाली आहे. वणी ठाण्‍यात कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची धडपड सुरू असते. आता कोण बाजी मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Rokhthok News