Home Breaking News Manse Dahihandi : 41 फुटांचा थरार…वणीत

Manse Dahihandi : 41 फुटांचा थरार…वणीत

● महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन ● लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

1032
C1 20240404 14205351

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजन
लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

MNS NEWS WANI | विदर्भात प्रथमच भव्यदिव्य स्वरूपात दहीहंडीचा उत्सव वणीत साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचा 41 फुटांचा थरार 11 सप्टेंबरला येथील शासकीय मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. The thrill of Dahi Handi will be experienced on September 11, conceived by Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar.

कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतरही गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतो, पुणे, ठाणे आणि मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. आता राज्यभरात या उत्सवाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. मनसे च्या वतीने वणी शहरात दहीहंडीचा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

“ढाक्कुमाक्कुम…टाक्कमाक्कुम..बोल बजरंग बली की जय” चा जयघोष आणि गोविंदा पथकाचे थरारक मानवी मनोरे अंगावर शहारे आणणारे असते. दहीहंडीच्या सोहळ्यात मातीचे भांडे दही भरून दोरीवर टांगले जाते आणि गोविंदा पथक मानवी मनोरे करत ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी उपस्थितांमध्ये संचारणारा जल्लोष अवर्णनीय असतो.

मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नागपुर, अमरावती, परातवाडा, औरंगाबाद, ठाणे, कल्याण व अन्य शहरातील गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सेलिब्रिटींची वर्दळ आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केल्या जाणार आहे.
Rokhthok News