Home Breaking News अरेच्चा..पोलिसाचाच Facebook अकाउंट ‘हॅक’

अरेच्चा..पोलिसाचाच Facebook अकाउंट ‘हॅक’

571

आणि होत आहे पैश्याची मागणी

निष्णात हॅकर कधी कोणाचे facebook अकाऊंट हॅक करेल याचा नेमच नाही. यापूर्वी अनेक मोठया अधिकाऱ्यांचे facebook अकाऊंट हॅक केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर चक्क पोलीस शिपायचेच facebook अकाऊंट हॅक केल्याने या हॅकरर्सना पोलिसांची भीती उरलेली नाही.

फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप चा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने जगात घडलेली घटना क्षणात वाऱ्या सारखी प्रसारित होते. हे सोशल मीडिया नागरिकांना फायद्याचे ठरते असतानाच आता डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे. अनेक नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अनेक उदाहरणे उजेडात आलेली आहेत.

समाज माध्यमावरून सातत्याने होत असलेली अनेकांची फसवणूक चिंतेचा विषय असला तरी पोलीस प्रशासन सहजासहजी आरोपी पर्यंत पोहचताना दिसत नाही. त्यामुळे या हॅकरर्सची हिम्मत वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे facebook अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली असतानाच वणी वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस कर्मचारी गोपाल हेपट यांचे facebook अकाऊंट हॅक झाले आहे. आणि त्यांच्या बऱ्याच मित्रांना पैशाची मागणी होत असल्याची माहिती हेपट यांना मिळताच त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून कोणीही पैसे देऊ नये असे आवाहन केले आहे.
वणी: बातमीदार