Home वणी परिसर सामान्य ज्ञान परिक्षा हा भविष्याचा वेध घेणारा उपक्रम

सामान्य ज्ञान परिक्षा हा भविष्याचा वेध घेणारा उपक्रम

203

● संजय खाडे यांचे प्रतिपादन

रोखठोकः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी चे औचित्य साधून सावर्ला येथे सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली. याप्रसंगी बोलतांना रंगना‍थ स्‍वामी अर्बन निधी लि. चे अध्‍यक्ष संजय खाडे म्‍हणाले की, ‘ग्रामिण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेस तयार होण्यासाठी हा उपक्रम भविष्याचा वेध घेणारा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्‍यांना नवी उर्जा मिळत असल्‍याचे प्रतिपादन यावेळी करण्‍यात आले.

https://youtube.com/shorts/RW5XsTaL2oI?feature=share

आयोजित कार्यक्रमांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी सरपंच मारोतराव चोपणे हे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणुन संजय खाडे, सरपंचा कुंदा चोपणे, भैय्याजी पिंपळकर, अरूण राजुरकर, श्यामराव देठे, स्वाती आवारी, कविता अवगान यांची उपस्थिती होती. यावेळी खाडे यांचा  नामदेव घोडमारे व भैय्याजी केळझरकर यांच्याहस्ते ” ग्रामभुषण पुरस्कार” देवून सत्‍कार करण्‍यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्‍य आयोजित कार्यक्रमात सुहानी चोपने, सुरभी चोपने, सानिया आवारी, भाग्यश्री आवारी, आस्था झाडे, आचल खामनकर, उत्कर्षा पिंपळकर, प्रांजली आवारी, मयुरी पिंपळकर, कोमल चिव्हाणे, सोनु चोपने, संकिता चोपने, साक्षी मालेकर या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.  तसेच रामधुन,  किर्तन, भजन व महाप्रसाद असे कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल तुराणकर, संचालन नारायण मांडवकर तर आभार श्वेता पिंपळकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरूदेव सेवा मंडळ, श्री गुरूदेव वाचनालय व समस्त ग्रामस्थ सावर्ला यांच्या वतीने करण्यात आले होते.
वणीः बातमीदार