Home Breaking News भीषण…सिलेंडर चा स्फोट, गर्भवती मातेसह चिमुकलीचा करुण अंत….

भीषण…सिलेंडर चा स्फोट, गर्भवती मातेसह चिमुकलीचा करुण अंत….

2270

पती गेले होते देवदर्शनाला

वणी: परिवाराच्या सुख समृद्धीसाठी पद यात्रा करत पती देवाला साकडे घालण्यासाठी गेला होता. मात्र नियतीने डाव साधला. बुधवारी सकाळी सिलेंडर चा स्फोट झाल्याने गर्भवती महिला व चार वर्षांची चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील आयता येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आर्णी तालुक्यातील आयता हे गाव आहे, या गावात विनोद जयस्वाल आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. धामणगाव येथे मुंगसाजी महाराज यांच्या दर्शनासाठी गावातून पदयात्रा निघाली होती. यात विनोद ने सहभाग घेत देवदर्शनाला निघाला होता.

पत्नी काजल व चार वर्षीय चिमुकली ‘परी’ उर्फ विजयालक्ष्मी ह्या दोघी घरी होत्या. बुधवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास स्वयंपाक करण्याकरीता काजलने गॅस पेटवताच आगीचा भडका उडाला. व काही क्षणातच सिलेंडर चा जबरदस्त स्फोट झाला व आगीने रौद्ररूप धारण केले, घरातील सर्व वस्तूसह गर्भवती काजल व परी ला आगीने कवेत घेतले यामध्ये दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आग लागताच ग्रामस्थानी घाटंजी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामस्थानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र या घटनेत दोघी मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घडलेल्या या भयावह घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार