Home Breaking News त्या…बेपत्ता वृद्धाचा अखेर मृतदेहच ‘गवसला’

त्या…बेपत्ता वृद्धाचा अखेर मृतदेहच ‘गवसला’

1239

आत्महत्या की घातपात, विविध चर्चेला उधाण

ज्योतिबा पोटे: येथील सुभाषचंद्र बोस चौकात वास्तव्यास असलेले 66 वर्षीय वृद्ध घरी काहीही न सांगताच दोन दिवसांपूर्वी निघून गेले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलिसात करण्यात आली होती. त्यांचा मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट (66) हे शहरातील सुभाषचंद्र बोस चौक परिसरात वास्तव्यास होते. ते दि. 7 मे ला दुपारी घरात कोणालाच काहीही न सांगता बाहेर पडले ते घरी परतलेच नाही. त्यांची आजूबाजूला, नातेवाईकांकडे शोधाशोध करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा शरद याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलिसात नोंदवली होती.

मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात सोमवार दि. 9 मे ला सकाळी मठाच्या बाजूला असलेल्या झाडाझुडुपांच्या मागे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. तातडीने पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला आणि ओळख पाठविण्यात आली. तो मृतदेह विजय हेपट यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळावरील निरीक्षण व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार असले तरी ती आत्महत्या की घातपात याबाबत प्राथमिक निष्कर्ष काढणे अवघड असून तापसाअंती खरे कारण स्पष्ट होणार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
मारेगाव: बातमीदार