Home वणी परिसर लॉयन्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे यश

लॉयन्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज चे यश

537
C1 20240404 14205351

वणी बातमीदार: येथील लॉयन्स इंग्लीश मिडीयम हायस्कुलने यशाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा 10 वी व 12 वीत घवघवीत यश संपादन केले आहे.एस.एस.सी परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात सृष्टी विनोद सुके 97.40 टक्के, युक्ता प्रमोद बैद 97 टक्के, मृन्मयी अभय सोमलकर 96.40 टक्के गुण प्राप्त केले तर 99 विदयार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. एकुण 165 नियमित विदयार्थी परिक्षेत प्रविष्ठ झाले होते.

त्याप्रमाणेच लॉयन्स इंग्लीश मिडीयम हायस्कुल ज्युनिअर (सायन्स) कॉलेज चा 12 वी चा निकाल 100 टक्के लागला असुन किष्णा विलास ठोंबरे 92.50 टक्के, अक्षदा सतिश घुले 91 टक्के, मनिष माधव तुराणकर 90.82 टक्के गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातुन सर्वाधीक गुण प्राप्त केले आहे. बारावी परीक्षेत 23 विदयार्थी प्राविण्या सह उत्तीर्ण झाले. एकुण 46 नियमित विदयार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते.

उतीर्ण विदयार्थी व पालकांचे शाळेचे अध्यक्ष शमीम अहेमद, उपाध्यक्ष डॉ. के. आर लाल, सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष रमेश बोहरा, संचालक डॉ. आर.डी. देशपांडे, सुधीर दामले, चंद्रकांत जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, ललीता बोदकुरवार, प्रशांत गोडे, शिक्षक व कर्मचा-यांनी अभिनंदन केले.