Home Breaking News थरारक…बस चे मागील चाक निखळले

थरारक…बस चे मागील चाक निखळले

2436

वणी गडचांदूर बस, प्रवाशी सुखरूप
शिरपूर जवळ घडली घटना

वणी: वणी आगार ची गडचांदूर ला जात असलेल्या बस चे मागील चाक निखळून चक्क नदीत पडले. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अपघात टाळला. बस मध्ये तब्बल 18 प्रवाशी होते, ही घटना मंगळवार दि. 9 ऑगस्टला चारगाव जवळ दुपारी घडली.

वणी वरून गडचांदूर ला बस क्रमांक MH-40-8953 जात होती. बसमध्ये 18 प्रवाशी तसेच चालक मुलनकर व वाहक अविनाश बोबडे हे होते. चारगाव- शिरपूर मार्गावरील नदीच्या पुलावर चालत्या बसचे मागील दोन चाके निखळली. यातील एक चाक नदीत पडले तर दुसरे चाक अडकूनच राहिले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. चारगाव ते गडचांदूर पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ठीक ठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बस चे चाक निखळल्याची घटना आगार व्यवस्थापकांच्या निष्क्रियतेचा परिपाक आहे. रस्ता खराब असल्याचे माहीत असताना प्रवाश्यांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे यावेळी बोलल्या जात होते. या घटनेत सर्व प्रवाशी सुखरूप आहेत मात्र वणी आगरातून बस रवाना होण्यापूर्वी फिटनेस बघण्याचे सौजन्य आगार प्रमुखाने दाखवणे गरजेचे होते.
वणी: बातमीदार