Home क्राईम Crime…सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात

Crime…सात जुगारी पोलिसांच्या ताब्यात

● 54 हजार रुपये रोकड जप्त

1445
C1 20240404 14205351

54 हजार रुपये रोकड जप्त

Wani News | तालुक्यातील भांदेवाडा येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने धाडसत्र अवलंबले असता 54 हजार 470 रुपये रोख व सात जुगाऱ्याना ताब्यात घेत शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Seven gamblers were detained and a case was registered on Saturday.

राहुल नानाजी गोरे (29), नामदेव अर्जुन आत्राम (54), मिलींद वसंता डभारे (45), सुर्यभान रमेश देवाळकर (26), शंकर यादव खापणे (45), चन्द्रभान रमेश देवाळकर (30) हे सर्व भांदेवाडा येथील निवासी आहेत तर पवन शेषराव बरडे (25) राहणार निंबाळा असे ताब्यातील जुगाऱ्यांची नावे आहेत.

तालुक्यात जुगार खेळणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यातच पोलिसांच्या कारवाया सुद्धा वाढल्या आहेत. भांदेवाडा येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता जुगारी पैशाची बाजी लावुन हार जितचा कट पत्ता नावाचा जुगार खेळतांना मिळुन आले. त्यांचे जवळून 50 रुपयांचे ताशपत्ते व 54 हजार 420 रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या आदेशाने ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.
Rokhthok News