Home Breaking News Goutami Patil : गौतमी पाटीलच्या आगमनाची उत्सुकता

Goutami Patil : गौतमी पाटीलच्या आगमनाची उत्सुकता

● औचित्‍य T-10 चॅम्पियन्‍स लीगचे

1798
C1 20231209 12474146

औचित्‍य T-10 चॅम्पियन्‍स लीगचे

Wani News : शहरात क्रिकेट सामन्‍याची रंगत अनुभवायला मिळणार आहे. पारसमल प्रेमराज ज्‍वेलर्स प्रस्‍तुत T-10 चॅम्पियन्‍स लीगचे सामने आयोजीत करण्‍यात आले आहे. या निमीत्‍ताने 29 डिसेंबरला प्रसिध्‍द नृत्‍यांगना गौतमी पाटील आपल्‍या दिलखेचक अदांनी तरुणाईला घायाळ करण्‍यासाठी येत आहे. Dancer Gautami Patil is coming to slay the youth with her delightful performances.

ऍड. कुणाल विजय चोरडीया यांचे अध्‍यक्षतेखाली T-10 चॅम्पियन्‍स लीगचे आयोजन करण्‍यात आले आहे. बक्षीसांची लयलुट केल्‍या जाणार आहे. प्रथम बक्षीस अकरा लाख रुपये तर द्वितीय बक्षीस पाच लाख रुपये असणार आहे. तृतीय आणि चतुर्थ बक्षीस क्रमशः अडीच व एक लाख रुपये असेल.

वणी विधानसभा क्षेञातील सर्व क्रिकेट खेळांडू व प्रेक्षकांसाठी गौरवशाली सोहळा आयोजीत करण्‍यात आला आहे. प्‍लेअर नोंदणी करण्यात आली तसेच टिमचा लिलाव 18 नोव्‍हेबंरला तर प्‍लेअर लिलाव 25 नोव्‍हेंबरला करण्यात आला आहे. वणीतील T-10 चॅम्पियन्‍स लीगचे हे दुसरे वर्ष आहे. या सामन्‍यात मॅन ऑफ द सिरीज खेळाडूला रेसर बाईक दिल्‍या जाणार आहे.

चॅम्पियन्‍स लीगच्‍या उद्घाटन प्रसंगी नृत्‍यांगना गौतमी पाटील यांचा बहारदार नृत्‍यांचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे. शासकीय मैदानावर भव्‍यदिव्‍य कार्यक्रम होणार असल्‍याने कडेकोट बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे. गौतमी पाटील यांच्‍या आगमनाची उत्‍सुकता वणीकरांना लागली आहे.

महाराष्‍ट्रात प्रथमच भव्‍यदिव्‍य चॅम्पियन्‍स लीगचे आयोजन करण्‍यात येत आहे. याकरीता आयोजन समितीचे मनिष गायकवाड, उमेश पोद्दार, संदिप बेसरकर, पियुष चव्‍हाण, राजु रिंगोले, शुभम मदान,  संघदिप भगत, प्रकाश तुरानकर,  नंदकिशोर रासेकर,  तौसिफ खान व कार्यकर्ते परिश्रम घेताहेत.
Rokhthok News