Home Breaking News Sad News : वीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Sad News : वीस वर्षीय विवाहितेची आत्महत्या

● गळफास लावून संपवले आयुष्य

1697
C1 20231209 15061000

गळफास लावून संपवले आयुष्य

Wani News : शहरातील शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या वीस वर्षीय विवाहितेने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. ही दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 9 डिसेंबरला दुपारी उघडकीस आली. A 20-year-old married woman living in Shastrinagar area ended her life by hanging herself.

जयश्री कुळसंगे (20) असे मृतक विवाहितेचं नावं आहे. ती शास्त्रीनगर भागात वास्तव्यास होती आणि कॅटर्सच्या व्यवसायात काम करत होती. घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसल्याचे बघून तिने घरातच गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

घटनेची माहिती तिच्या कुटुंबाला कळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तिने हे आत्मघाती निर्णय का घेतला हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
Rokhthok News