Home Breaking News “शिवजन्मोत्सव” मिरवणुकीसाठी शिवप्रेमी सज्ज

“शिवजन्मोत्सव” मिरवणुकीसाठी शिवप्रेमी सज्ज

603
C1 20240404 14205351

प्रमुख आकर्षण किल्ल्याची प्रतिकृती

विद्युत रोषणाई आणि लेझर शो

रोखठोक | छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठया उत्साहात व जल्लोषात साजरी होत आहे. वणीतील शिवतीर्थ शिवप्रेमींनी फुलला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अवघ्या काही क्षणातच फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाचा गजर आणि भव्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

थोडया वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे करतील. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीसह विद्युत रोषणाई, लेजर शो द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी 6:54 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक नागपूर येथील 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सायंकाळी वणी, मारेगाव व झरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती. यामुळे शहरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शिवप्रेमींनी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन मनसेने केले आहे.
वणी: बातमीदार