Home Breaking News धुमधडका….. शासनाच्या रेतीचेच अवैद्य उत्‍खनन…!

धुमधडका….. शासनाच्या रेतीचेच अवैद्य उत्‍खनन…!

● अहेरी- बोरगाव रेती घाटावर महसुलाची कारवाई

932

 अहेरी- बोरगाव रेती घाटावर महसुलाची कारवाई

Untreated mining of sand wani: तालुक्यातील अहेरी- बोरगाव रेती घाटातून नियमबाह्य रेतीचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारावर महसूल विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. त्‍या ठिकाणी दोन हायवा वाहने व पोकलेन मशिन आढळुन आली आहे. सदर वाहने जप्‍त करण्‍यात आले असुन आता महसुल विभाग यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. The vehicles have been impounded and now the revenue department is looking at what action will be taken.

रेती तस्करीवर आळा बसावा व ग्राहकांना स्वस्तदरात रेतीचा पुरवठा व्हावा याकरिता राज्य सरकारने महत्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाच्या अखत्यारीत रेतिघाटाचा लिलाव करून डेपोतून नोंदणीकृत रेती ग्राहकांना रेतीचा पुरवठा करण्याचे धोरण आखण्यात आले. तर विहित घाटावरून रेतीचे नियमानुसार उत्खनन करून डेपोत साठवणूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

तालुक्‍यातील बोरगांव- अहेरी घाटातुन माञ नियमांना तिलांजली देत रेतीचे उत्‍खनन अवैद्यरित्या होत असल्‍याची बाब समोर आली. महसुल प्रशासनाच्‍या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत घाटातील दोन हायवा ट्रक व एक पोकलेन मशिन ताब्‍यात घेतल्‍याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी उप विभागीय अधिकरी SDO यांचेकडे रितसर अहवाल दाखल केला आहे. माञ अदयाप कारवाई झालेली नसल्‍याने नियमांचे उल्लंघन करणारे घाट लिलाव धारक मोकाट तर सुटणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

तालुक्‍यातील बोरगांव अहेरी रेती घाट शासनाने लिलाव केला आहे. त्‍या घाटावरील रेती उत्‍खनन व वाहतुक करण्‍यासंबंधी नियमावली जाहिर करण्‍यात आलेली आहे. त्‍यानुसारच रेतीची वाहतुक करण्‍याचे निर्बंध असतांना घाटात हायवा ट्रक व पोकलेन मशिनचे कामच काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सदर रेती घाट धारक समिर रंगरेज यांच्‍या मालकीचे वाहने महसुल प्रशासनाच्‍या कर्मचाऱ्यांनी ताब्‍यात घेतले आहे. हायवा ट्रक क्रमांक MH- 34 -BG -9452 व MH- 34- BG- 1212 व 210 हयुडंई पोकलेन मशिन महसुल विभागाने ग्राम पंचायतीच्‍या सुपुर्द केली आहे.

अहेरी- बोरगाव येथील घाटाचा लिलाव करण्यात आला आहे तर ब्राम्हणी येथे रेती डेपोची निश्चिती करण्यात आली आहे. रेती घाटातून रेतीचे उत्खनन करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली  आहे. मजुरांच्या साह्याने रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच डेपोत रेतीची साठवणूक कारावी लागते.

नोंदणीकृत ग्राहकाला नियमानुसार रेतीचा पुरवठा करावा लागतो माञ नियमबाह्य होत असलेल्‍या रेती तस्‍करीला आळा बसावा याकरीता महसुल प्रशासन सज्‍ज झाल्‍याचे या घटनेवरुन दिसत आहे. सदर कारवाई महसूल विभागाचे सी.बी.आकुलवार,  जयंत झाडे व महेश दलाल यांनी केली. या प्रकरणी त्या घाटाचे लिलावधारक यांचेवर महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे असुन रेती तस्‍करीला आळा बसावा याकरीता कठोर पाउले उचलणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News