Home Breaking News सर्पदंश… चिमुकल्या बालकाचा मृत्यू

सर्पदंश… चिमुकल्या बालकाचा मृत्यू

● सात वर्षीय बालकाला अंगणात खेळत असताना विषारी सापाने चावा घेतला. ही बाब त्याने आईला सांगितली आणि.....

2166
C1 20240404 14205351

नायगाव येथील घटना

Snakebite News Wani | तालुक्यातील नायगाव (खु) येथे वास्तव्यास असलेल्या सात वर्षीय बालकाला अंगणात खेळत असताना विषारी सापाने चावा घेतला. ही बाब त्याने आईला सांगितली आणि त्याचवेळी त्याला अस्वस्थ वाटायला लागले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि.10 जूनला घडली. A seven-year-old boy was bitten by a poisonous snake while playing in the yard.

साहील बंडु सिडाम (07) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तो सकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. अचानक त्याचे पायाला चावा घेतल्याचे जाणवले. तो धावतच घरात गेला व काहीतरी चावल्याचे त्याने आईला सांगितले.

काही वेळाने त्याला अंधारी आल्यासारखे वाटू लागले त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दुपारी तीन वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने परिवार शोक सागरात बुडाला आहे.
Rokhthok News