Home Breaking News शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी, स्था‍निक संतप्त

शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी, स्था‍निक संतप्त

808

वणी परिसरात पावसाची धुवांधार बॅटींग

वणीः मागील दोन दिवसापासून परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. बळीराजा सुखावला असला तरी शहरातील नागरीकांना माञ साचलेल्‍या पाण्‍याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे. शहरातील विद्यानगरी, आनंद नगर, एकता नगर, मोमीनपुरा, खरबडा आदि भागातील रस्‍त्‍यावर आणि घरात पाणी शिरल्‍याने काही काळ नागरीकांची तारांबळ उडाली होती.

पावसाळयापुर्वी पालीका प्रशासनाने पाण्‍याचा योग्‍यप्रकारे निचरा व्‍हावा याकरीता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. माञ जोरदार कोसळलेल्‍या पावसाने शहरातील काही भागात चांगलाच कहर माजवला होता. विद्यानगरी, आनंद नगर भागातील घरापर्यंत पाण्‍याची मजल गेल्‍याचे चिञ बघावयास मिळाले.

आनंद नगर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. बालविद्या शाळेचे मैदान पाण्‍याने झाकले आहे. रस्‍त्‍यावर साचलेल्‍या पाण्‍याने बाहेर पडण्‍याचा मार्ग अदयाप शोधला नाही. तर माजी नगरसेवकाच्‍या घराजवळील एका घरात पाण्‍याने शिरकाव केला होता.

आनंद नगर भागात पाणी शिरण्‍याकरीता सर्वस्‍वी जबाबदार लगतचे नविनतम ले आउट आणि काली बस्‍तीचा परिसर असल्‍याचे मत माजी नगरसेविका रंजना झाडे यांनी व्‍यक्‍त केले. लगतच्‍या नविनतम ले आउट मध्‍ये आउटलेट ची निर्मीती न केल्‍याने तसेच कालीबस्‍ती परिसरातील पाणी निचरा होण्‍याची व्‍यवस्‍था योग्‍यप्रकारे नसल्‍याने ते पाणी आनंद नगर परिसरात शिरत असल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.

पालीका प्रशासनाने पाण्‍याचा योग्‍यप्रकारे निचरा व्‍हावा याकरीता परिपूर्ण नियोजन करणे गरजेचे आहे. नव्‍याने होत असलेल्‍या ले आउट मधील पाणी वाहून जाण्‍याकरीता सर्वप्रथम नाल्‍या आणि गटारे निर्माण करणे बंधनकारक आहे. विद्यानगरी मध्‍ये पावसाळयात साचणारे पाणी पालीका प्रशासन व ले आउट धारकांची कार्यप्रणाली अधोरेखीत करणारी आहे.

वणीः बातमीदार