Home Breaking News विवाहितेने पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

विवाहितेने पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

● परिवार झोपेत असताना उचलले टोकाचे पाऊल

2342

परिवार झोपेत असताना उचलले टोकाचे पाऊल

Sad News Wani | घरची मंडळी घरात साखर झोपेत असताना 35 वर्षीय विवाहितेने अंगावर ज्वलनशील द्रव ओतून पेटवून घेतले. ही घटना रविवारी पहाटे 4:30 वाजताच्या दरम्यान नवरगाव (उमरी) येथे घडली. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले होते मात्र सोमवारी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. A married woman poured flammable liquid on her body and set her on fire.

सरस्वती दिनेश चार्लीकर (35) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ती पती दिनेश, दोन मुली व सासू यांच्यासह नवरगाव येथे वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी सर्व मंडळी घरात झोपलेली असताना पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास ती पहिल्या मजल्यावर गेली. तिने अंगावर ज्वलनशील द्रव ओतले व स्वतः ला पेटवून घेतले.

अवघ्या काही क्षणातच आगीने तिला कवेत घेतले. तिच्या किंचाळ्या ऐकताच शेजारी व पारिवारिक मंडळींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले होते मात्र सोमवारी सकाळी 8:30 वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
Rokhthok News