Home क्राईम इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

499
C1 20240404 14205351

*चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू

वणी बातमीदार: निळापूर ब्राम्हणी मार्गावर असलेल्या समृद्धी अपार्टमेंट मधील सदनिकेत 35 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आली. त्यांचा चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संदीप अडलाकोंडा (35)असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. ते शहरातील निळापूर ब्राम्हणी मार्गावर असलेल्या समृद्धी अपार्टमेंट मधील एका सदनिकेत वास्तव्यास होते. मंगळवार दि. 10 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजताचे दरम्यान त्याने खोलीतील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरातील मंडळीला ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.