Home वणी परिसर कोलगाव येथे शास्रशुद्ध फवारणी मार्गदर्शन

कोलगाव येथे शास्रशुद्ध फवारणी मार्गदर्शन

234
C1 20240404 14205351

*कृषी दुताचा पुढाकार

मारेगाव बातमीदार-दीपक डोहणे: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय कोहारा येथील कृषीदूत पियुष संजय पारखी यांनी शास्रशुध्द फवारणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शेतकऱ्यांना फवारणी प्रारंभी स्वच्छ पाणी वापरून मास्क, हातमोजे वापरण्याची सूचना केली. फवारणी करतांना धूम्रपान व तंबाखूजन्य मादक पदार्थाचे सेवन करू नये अशा आशयाच्या सूचना करीत प्रात्यक्षिक करून दाखविले. जिवितास संकटाचा प्रसंग ओढवेल असे न वागता सतर्कता बाळगण्याचा सल्ला व मार्गदर्शन यावेळी कोलगाव परिसरातील शेतकऱ्यांना करण्यात आले. कृषिदूत म्हणून पियुष संजय पारखी यांनी काम पाहिले. प्रात्यक्षिक करिता प्राचार्य महेश राठोड, प्रा.विशाल भाकडे, प्रा.हेमंत वानखेडे, प्रा.शुभम शिरपूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.