Home Breaking News शहराच्या मध्यवस्तीतील घर चोरट्यानी ‘फोडले’

शहराच्या मध्यवस्तीतील घर चोरट्यानी ‘फोडले’

1168
C1 20240404 14205351

70 हजाराच्या मुद्देमालाची चोरी..!

वणी | शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौक परिसरातील बंद घर चोरट्याने फोडले आहे. यामध्ये 50 हजार नगदी व सोन्याचे दागिने, किमती घड्याळ, मोबाईल असा जवळपास 70 हजाराचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना शनिवार दि. 10 सप्टेंबर ला उघडकीस आली.

टागोर चौकात अशोक ठावरी यांचे घर आहे. गणपती असल्याने ते परिवारासह बाहेर गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यानी काम फत्ते केले. शुक्रवारी मध्य रात्रीला घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरात प्रवेश केला व कपाटातील सामानाची नासधूस केली. यावेळी नगदी 50 हजार रुपये, काही सोन्याच्या वस्तू, महागडी घडी असा मुद्देमाल लंपास केला.

शनिवारी ठावरी बाहेर गावावरून आले असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिक घर बंद करून बाहेर गावी जात आहे. याचाच फायदा हे चोरटे घेतांना दिसत आहे. पोलिसांनी ठावरी यांचे घर गाठले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे.
वणी: बातमीदार