Home राजकीय ऍड सुरज महारतळे काँग्रेस मध्ये दाखल

ऍड सुरज महारतळे काँग्रेस मध्ये दाखल

588
Img 20240613 Wa0015
खा धानोरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश

वणीतील सुप्रसिद्ध वकील सुरज महारतळे यांनी  चंद्रपूर येथे खासदार बाळूभाऊ धानोरकर व माझी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत  युवकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

काँग्रेसची विचारधारा ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हिताची आहे.  सामाजिक कार्याला सत्तेची जोड असल्याशिवाय गोरगरीब समाजबांधवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होणार नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले.

यावेळी ऍड. सूरज महारतळे, गिरीश कुबडे, ऍड. शुभम महारतळे, सौरभ देरकर, आकाश बोबडे, हितेश थोटे, गौतम शाहारे, अमोल पोहाणे यांनी प्रवेश घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वणी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा विशाल महासागर आहे. काँग्रेस पक्षात कोणीही प्रवेश करू शकतो. काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करते. युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा विचार अंगीकारणे गरजेचे आहे. पुढे देखील अशाच प्रकारे संघटन वाढीकरिता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वणी-प्रतिनिधी

C1 20240529 15445424