Home वणी परिसर WCL ने संपादित केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन 24 कोटी

WCL ने संपादित केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन 24 कोटी

740

मुंगोली च्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
4 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश

मुंगोली गावठाण मधील WCL ने संपादीत केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन व्हावे याकरिता 2017 पासून ग्रामस्थ लढा देत आहे. उप सरपंच ऍड. रुपेश ठाकरे यांनी अखेर प्रशासनाला एक महिन्याचा “अल्टीमेंटम” देत आंदोलनाचा इशारा दिला होता. PWD ने मालमत्तेचे मुल्यांकन करून प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. यामुळे मुंगोली च्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला.

PWD च्या ढिसाळ कारभाराचा फटका मुंगोली ग्रामस्थांना मागील 4 वर्षांपासून सहन करावा लागला. ग्रामस्थांनी अनेकवेळा पाठपुरावा करून सुध्दा संपादित मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आले नाही. यामुळे पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाला होता. त्या प्रमाणेच WCL कडून मिळणाऱ्या मोबदल्यापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागले.

मुंगोली येथील गावठानामधील संपादित मालमत्तेच्या मुल्यांकनाची पूर्ण किंमत 24 कोटी 4 लाख 65 हजार 774 रुपये एवढी असून 649 परिवाराला होणार लाभ होणार आहे. 4 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश आले असून मुंगोली च्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुनर्वसना सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. जिल्हाधिकारी यांचेमार्फत वारंवार पत्र देऊन सुध्दा मुल्यांकनाबाबत कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे ग्रामस्थांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला.

ऍड. रुपेश गुणवंत ठाकरे, उपसरपंच मुंगोली यांनी दि. 27 सप्टेंबर ला प्रशासनाला निवेदन देत एक महिन्याच्या आत मूल्यांकन करावे अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करत असल्याचा “अल्टीमेंटम” दिला. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी मुंगोली गावठानामधील WCL ने संपादित केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करून अहवाल सादर केला.
वणी: बातमीदार